आसामात महापुराची स्थिती

0
13

30 जणांचा मृत्यू, साडेतीन लाख लोक अडकले

ईशान्येकडील आसाम राज्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महापुराची स्थिती उद्भवली असून महापूरामुळे आसामच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सुमारे साडेतीन लाखांहून अधिक लोक आसाम राज्याच्या अनेक भागात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे.

महापूरमध्ये शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे एकोणीस जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यामुळे घरे, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सुमारे 30 हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. पुरामुळे जनावरांची सुद्धा दैना उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. आसाम राज्यामधील 10 जिल्ह्यातील 3100 नागरिकांना अजून पाण्याखाली राहावे लागत आहे. पंधरा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे. तसेच 100 हून अधिक मदत छावण्यांची उभारणी करण्यात आली आहे. कामरूप, हैलाकांडी, उदालपूरी, होजई, मलबारी, धृबी, करीमगंज, दक्षिण सलमारा, गोलपारा इत्यादी एकूण 30 लाख 90 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. पावसाचा जोर आता कमी झाला आहे. तरीही 19 जिल्हे अजूनही पूरग्रस्तच आहेत.