राज्य सरकारने गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ श्रेणीतील 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला.
दीपक देसाई यांची अतिरिक्त सचिव (एआरडी), केदार नाईक यांची संचालक (प्रशासन) गोवा क्रीडा प्राधिकरण, विशाल कुंडईकर यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी 3 दक्षिण गोवा, पुंडलिक खोर्जुवेकर यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी 1 उत्तर गोवा, अक्षय पोटेकर यांची अतिरिक्त संचालक दक्षता-2, गुरुदास देसाई यांची राज्य निबंधक व नोटरी हेड, तृप्ती मणेरकर यांची संयुक्त सचिव (आरोग्य), प्रवीण परब यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी 2 उत्तर गोवा, उदय प्रभुदेसाई यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी 2 दक्षिण गोवा, पराग नगर्सेकर यांची सचिव – गोवा रेरा प्राधिकरण, फ्रान्सकिना ऑलिव्हेरा यांची संचालक – महिला बाल कल्याण खाते, मानुएल बार्रेटो – संयुक्त संचालक महिला व बाल विकास संचालनालय, राजू गावस यांची संचालक (प्रशासन) वीज खाते आणि वर्षा नाईक यांची दिव्यांग संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.