केंद्र सरकारने 18 जून रोजी नुकतीच पार पडलेली यूजीसी-नेट 2024 ची परीक्षा रद्द केली आहे. हा पेपर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे आयोजित केला जातो. परीक्षेतील गैरप्रकारामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यूजीसी-नेटपरीक्षा घेतली जाते.