लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी चढाओढ

0
4

घटक पक्षांच्या मदतीने केंद्रातील एनडीएच्या चालणार आहे; परंतु ना मंत्रिमंडळ विस्तारात आणि ना लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपने ताठर भूमिका घेत एकवेळ उपाध्यक्षपद देऊ; परंतु अध्यक्षपद देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. अध्यक्षपदावरून एकीकडे एनडीएमध्ये कमालीची शांतता असताना तिकडे विरोधकांनी उपाध्यक्ष पदावरून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे. जर उपाध्यक्ष पद दिले गेले नाही तर अध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करणार असल्याची वक्तव्े विरोधकांकडून करण्यात येत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच सभागृहात विरोधी पक्षनेता नव्हता. यावेळी इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. उपाध्यक्षपद रिकामे ठेवू नये म्हणून विरोधी पक्ष दबाव टाकू लागला आहे. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याचा प्रघात आहे; परंतु गेल्या सरकारमध्ये त्यांना ते पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधक यावेळेस उपाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. दरम्यान, जेडीयूने अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे.