तिघांकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त

0
8

पर्यटन पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल फोन हस्तगत केले. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर पंजाबामधील एका पर्यटकाची बॅग चोरीस गेली होती. त्या बॅगेत दोन मोबाईल फोन होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटक पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितांची तपासणी करण्यास सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यावर संशयितरित्या फिरणारे तिघे पोलिसाच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊन शकले नाहीत. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे तीन मोबाईल फोन आढळून आले. मनी कांता, कुमारिश आणि गुरुप्रसाद काळे अशी तिघा संशयितांची नावे असून त्यांना कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेल्या तीन मोबाईल पैकी 2 मोबाईल त्या पर्यटकांचे असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.