मागील पंधरा दिवसांत राज्यात 16 इंच पाऊस

0
12

राज्यात मागील पंधरा दिवसात 16.46 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत 3.1 टक्के जास्त नोंद झाले आहे. मडगाव येथे सर्वाधिक 21.49 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने येत्या 18 ते 20 जून या काळासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात मागील सहा दिवसांपासून मोसमी पावसाचे प्रमाण थोडे कमी आहे. चोवीस तासांत केवळ 0.52 इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात 3 जूनपासून पावसाची नोंद होण्यास प्रारंभ झाला आहे. 6 ते 9 जून याकाळात पावसाची अंदाजापेक्षा जास्त नोंद झाली आहे. 7 जूनला आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 3.78 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासांत मुरगाव येथे सर्वाधिक 1.81 इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे 0.92 इंच, म्हापसा येथे 0.86 इंच, पणजी येथे 0.84 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. तर, ओल्ड गोवा, साखळी, वाळपई, दाबोळी, फोंडा. सांगे येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. राज्यात मागील पंधरा दिवसात मडगाव येथे सर्वाधिक 21.49 इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे 19.79 इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण, केपे, पणजी, दाबोळी या भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

पडझडीच्या 259 घटना
राज्यात या पंधरा दिवसांत पडझडीच्या 259 घटना आणि दरड कोसळण्याच्या 3 घटनांची नोंद झाली आहे. तर, चोवीस तासांत पडझडीच्या 11 घटनांची नोंद झाली आहे. राज्यातील झाडांच्या पडझडीच्या घटनांमुळे सुमारे 12 लाख 27 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे 49 लाख 87 हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले आहे.

कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तसेच, ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. असे हवामान 4-5 दिवस टिकू शकते अशा अंदाज वर्तवला आहे.
दक्षिण-पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळ तयार झाले आहे, ज्यामुळे मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

मान्सून गुजरातमध्ये
साधारणपणे 15 ते 20 जून दरम्यान मान्सून गुजरातमध्ये दाखल होतो. मात्र यावेळी 11 जून रोजीच नवसारी, गुजरातमध्ये मान्सूनचा पाऊस झाला. अहमदाबाद हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ रामाश्रय यादव यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम अशांततेमुळे मान्सून पुढे सरकलेला नाही. ते 20 जूनपर्यंत अहमदाबाद आणि सौराष्ट्रातील काही भागांसह इतर भागांमध्ये पुढे सरकते. 25 जूनपर्यंत सौराष्ट्रातील बहुतांश भागांचा समावेश आहे. 30 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण गुजरातचा वयापेल असा अंदाज वर्तवला आहे.