पणजी महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी जून महिन्याच्या अखेरपर्यंत वेळ द्यावा, असा अर्ज इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजीतील विकासकामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. तथापि, रस्त्याची कामे अजून अपूर्णावस्थेत आहेत. इमॅजिन पणजीच्या मुदतवाढीच्या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.