पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारला

0
12

>> पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर सही

शपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर काल नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. कार्यालयात पोहोचल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोदींचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे लवकरच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत.

केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारचा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय पहिला घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये 17 व्या हप्त्यामध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2 हजार रुपयांचा हा हप्ता कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. अर्थात एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. अद्याप ही योजना सुरू असून आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून 2 हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.