काल रविवारी ओडिशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. लोकसभा आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांचे अत्यंत निकटवर्तीय बीजेडीचे नेते व्हीके पांडियन यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पांडियन बीजेडीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. पांडियन यांनी एक व्हिडिओ जारी करुन आपला निर्णय जाहीर केला. पांडियन हे माजी मुख्यमंत्री पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. पण, बीजेडीच्या पराभवानंतर पांडियन यांच्यावर टीकेची झोड उठली.