4-5 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य

0
15

राज्यात मान्सूनचे आगमन हे 4 ते 5 जूनपर्यंत होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मान्सून 31 मेपर्यंत केरळमध्ये पोचण्यासाठी वातावरण पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. केरळहून मान्सून गोव्यात दाखल होण्यासाठी सुमारे 4 ते 5 दिवस लागतात. त्यामुळे केरळमध्ये मान्सून 31 मेपर्यंत पोचल्यास तो गोव्यात 4 ते 5 जूनपर्यंत पोहोचू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, मागील वर्षी मान्सूनचे 11 जून रोजी आगमन झाले होते. हवामान खात्याने गोव्यात 2 जूनपर्यंत तुरळक व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.सध्या राज्यात वातावरण दमट, ढगाळ असे असले तरी उष्णतेचा पारा काही कमी झालेला नाही. पणजीत सोमवारी कमाल तापमान हे 34.3 अंश सेल्सियस एवढे होते, तर मुरगावात ते 33.8 सेल्सियस एवढे होते. राज्यात 2 जूनपर्यंत कमाल तापमान 34, तर किमान तापमान हे 29 अंश सेल्सियस राहील.