निवडणूक आयोगाची खर्गे, नड्डा यांना नोटीस

0
20

काल बुधवार 22 मे रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख करत आहेत. तर भाजप नेते आपल्या भाषणात मुस्लिम आणि धर्मावर भर देत आहेत. आयोगाने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक विधाने करू नयेत असे निर्देश दिले आहेत.