कुपवाडा येथे दोन दहशतवादी ठार

0
37

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळ सुरक्षा दलांनी गुरुवारी दोन संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोघेही एलओसीवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. तंगधार सेक्टरमध्ये कुंपणाच्या पलीकडे दोघांचे मृतदेह पडलेले दिसले. दरम्यान, त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.