उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून आज (मंगळवार, दि. 14) पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एनडीएचे नेतेही हजर राहतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये 3 तासांत 5 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी उपस्थित होते. तसेच मोदींनी 30 मिनिटे बाबा विश्वनाथांची पूजा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी 4 अनुमोदक असतील. त्यात आचार्य गणेशवर शास्त्री, सोमा घोष सरोज चुडामणी, माझी समाजाचे एक प्रस्तावक आणि एक महिला प्रस्तावक असण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी सकाळी ते अस्सी घाटावर जातील. तिथून 10 वाजता कालभैरव मंदिरात दर्शन करतील. त्यानंतर जवळपास 10.45 च्या पुढे ते एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतील आणि 11.40 वाजता मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. दुपारी 12.15 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक त्यानंतर पंतप्रधान मोदी झारखंडसाठी रवाना होतील. दुपारी 3.30 वाजता कोडरमा गिरिडिह येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित
करतील.
दरम्यान, वाराणसी लोकसभा जागेवर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.