चौथ्या टप्प्यात 62.84 टक्के मतदान

0
17

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल 9 राज्ये आणि जम्मू-काश्मीर या एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान पार पडले. या जागांवर 62.84 टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.72 टक्के आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 35.97 टक्के मतदान झाले. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान झाले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.94 टक्के आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 36.58 टक्के मतदान झाले. आंध्रप्रदेशमध्ये 68.12 टक्के, बिहारमध्ये 55.90 टक्के, झारखंडमध्ये 63.37 टक्के, मध्यप्रदेशमध्ये 68.63 टक्के, महाराष्ट्रात 52.75 टक्के, ओडिशामध्ये 63.85 टक्के, तेलंगणामध्ये 61.39 टक्के आणि उत्तर प्रदेशात 57.88 टक्के मतदानाची नोंद झाली.

काल मतदानादरम्यान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील बोलपूरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) समर्थकांवर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. बिहारमधील मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करून दोन तरुणांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रात बीडमध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

लोकसभेबरोबरच काल आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांच्या विधानसभेसाठी मतदान झाले. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 175 जागांसाठी 68 टक्के मतदान झाले. ओडिशा विधानसभा निवडणुकीत 147 जागांसाठी 64 टक्के मतदान झाले.