>> अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद
काल अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या 10 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये अग्निवीर योजना बंद कली जाईल, देशभरात 200 युनिटपर्यंत 24 तास मोफत वीज, कंत्राटी नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात येतील, यासह विविध घोषणांचा समावेश आहे.
केजरीवालांच्या 10 घोषणा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपच्या 10 मोठ्या घोषणा सांगितल्या. त्यात देशातील सर्व गरिबांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा त्यांनी केली. आपल्या देशात 3 लाख मेगावॅट विजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. मात्र, आपण त्याचा वापर फक्त 2 लाख मेगावॅट एवढाच करत असल्याचा दावा यावेळी केजरीवाल यांनी केला.
शिक्षणाची गॅरंटी
सर्वांसाठी चांगले, उत्कृष्ट तसेच मोफत शिक्षण देण्याची हमी केजरीवाल यांनी यावेळी दिली. सरकारी शाळा या खासगी शाळांपेक्षा जास्त चांगले शिक्षण देऊ शकतात हे आम्ही शिक्षणाचे मॉडेल दिल्लीत राबवले आहे त्यावरून सिद्ध होत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
अग्निवीर योजना बंद
यावेळी केजरीवाल यांनी अग्निवीर योजना बंद करण्यात येणार असून ती लष्करासाठी घातक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. याबरोबरच कत्रांटी नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचे व भारतीय सैन्यास विशेष अधिकार देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. शेतकऱ्यांच्या पिकाला जर योग्य दर मिळाला तर शेतकरी सन्मानाचे जीवन जगू शकतो. त्यामुळे स्वामीनाथन अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना भाव दिला जाईल. तसेच आमची पुढची गॅरंटी ही दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा असेल. याबरोबरच देशातील व्यापाऱ्यांसाठी धोरणे आखू असे केजरीवाल म्हणाले.