आयपीएलवर सट्टेबाजी; धारगळ येथे दोघांना अटक

0
12

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने शिरगाळ – धारगळ येथे एका घरावर छापा टाकून आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या 2 युवकांना अटक केली. यावेळी संशयितांकडून 1.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.इंडियन प्रिमिअर लीगमध्ये लखनऊ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामान्यावर संशयित सट्टा घेत होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. बुधवारी रात्री 9 ते 11 यावेळेत ही कारवाई करण्यात आली आहे. शिरगाळ, धारगळ येथील एका बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी संशयित म्हणून प्रतीक विनुभाई कोरात (सुरत) व मिहीरभाई नटुभाई परमार (भावनगर) याना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइल फोन आणि इतर सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.