परूळेकरांच्या याचिकेवर आज सुनावणी

0
86

सेरूला कोमुनिदाद जमीन घोटाळा व फसवणूक प्रकरणी आपणावर असलेल्या आरोपांविरुध्द माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी आज ३१ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. वरीलप्रकरणी उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी परुळेकर यांना जारी केलेल्या समन्सच्या विरोधात परूळेकर यांनी उच्च न्यायालयात सदर याचिका सादर केलेली आहे.