सकरेव्होळ – काणकोण येथे बारचालकाचा संंशयास्पद मृत्यू

0
10

काणकोण पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या सकरेव्होळ या ठिकाणी शनिवारी 27 रोजी मध्यरात्री एक बार चालवणाऱ्या विल्सन फर्नांडिस (52) यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. विल्सन हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होतेअसे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काणकोणच्या पोलिसांनी तीन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या बाबतीत नेमके काय घडले ते सांगायला पोलीस निरीक्षक हरिष देसाई यांनी नकार दिला आहे.

विल्सन हे पणसुले काणकोण येथील असून यापूर्वी त्यांनी जवळ जवळ 22 वर्षे कोलवा रेसिडेन्सी चालवली आहे. त्यानंतर चावडी काणकोण येथील बार कॅरन त्यांनी काही काळ चालविले. सध्या सकरेव्होळ येथील एक आस्थापन तेचालवत होते. ते ज्या ठिकाणी मृतावस्थेत सापडले होते त्या ठिकाणी एक बंदूक होती. आणि काही काडतुसे पडलेली होती. त्यामुळे विल्सन यांना शिकारीचा नाद होता आणि त्यातूनच त्यांचा बळी गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी भोंवडीला गेल्या वेळी कुशाली वेळीप यांचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू होण्याचे प्रकरण अगदी ताजे असतानाच हे प्रकरण घडले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काणकोण तालुक्यातील बंदुका पोलीस स्थानकावर जमा करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही ही बंदूक घटनास्थळी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.