तिसऱ्या राज्य वित्त आयोगाचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवला

0
4

राज्य सरकारने तिसऱ्या राज्य वित्त आयोगाचा कार्यकाळ 30 जून 2024 पर्यत वाढविला आहे. यासंबंधीची सूचना पंचायत खात्याच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांनी जारी केली आहे.

राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये निवृत्त वित्त सचिव आणि माजी आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांच्या नेतृत्वाखाली तिसरा राज्य वित्त आयोग स्थापन केला. राज्य सरकारने कर, टोल आणि शुल्क यांचे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाटप कसे करावे, याची शिफारस करणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे.

या आयोगाने आपला अहवाल फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केला आहे. आयोगाने पंचायत, शहरी स्थानिक संस्था, उद्योग संस्था, स्वयंसेवी संस्था आणि धोरणकर्ते यांच्याशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा अहवाल तयार
केला.