विरियातोंना निवडणूक लढवण्यास बंदी घाला

0
18

पर्वरी येथील दत्ता बी. नाईक यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याविरोधात नवी दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यातील नागरिकांवर भारतीय राज्यघटना लादल्याचे वक्तव्य एका प्रचारसभेत बोलताना केले होते. फर्नांडिस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यघटनेचा अवमान झाला आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी दत्ता नाईक यांनी केली आहे.