विजेचा धक्का लागून वीज कर्मचारी जखमी

0
8

ढवळी-फोंडा येथे सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करीत असताना विजेचा धक्का बसून उपेंद्र नाईक (38, रा. आपेव्हाळ प्रियोळ) हा कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर मडगाव येथील इस्पितळात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील एका इमारतीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यासाठी उपेंद्र नाईक हा कर्मचारी वीज खांबावर चढला होता. त्यावेळी ट्रान्सफॉर्मरला असलेले दोन फ्यूज काढण्यात आले होते. एक फ्यूज काढण्यात आला नव्हता. त्यामुळे विजेचा धक्का लागून उपेंद्र नाईक हा खाली कोसळला. तो ट्रान्सफॉर्मर भोवती लावण्यात आलेल्या जाळीच्या कुंपणावर पडल्याने जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला 108 रुग्णवाहिकेतून फोंडा उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर जखमीला अधिक उपचारासाठी मडगाव येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. कर्मचाऱ्याच्या हाताला जखमा झाल्या असून, बुधवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या स्थितीत सुधारणा दिसून आल्याची माहिती मिळाली आहे.