उसगाव अपघातात एक गंभीर जखमी

0
14

पार-उसगाव येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात मोहित महादेव नाईक (18, रा. मुरमणे-गुळेली) हा दुचाकीचालक गंभीर, तर विराज शेटकर हा (रा. भामई-पाळी) हा किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या मोहित नाईक याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार-उसगाव येथे जीए-04-पी- 3566 आणि जीए-05-एच-1052 या दोन दुचाकींमध्ये धडक बसली. त्यात मोहित नाईक हा गंभीर जखमी झाला. त्याला 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले.