अधिक मनुष्यबळाद्वारे 31 मेपर्यंत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करणार

0
5

>> स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांची माहिती

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील विकासकामे येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी अधिक
मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजित रॉड्रिग्स यांनी एका आढावा बैठकीनंतर काल दिली.

शनिवारी पडलेल्या अवकाळी
पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले होते. त्यामुळे या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते. अवकाळी पावसामुळे पाणी साचल्याने कामात दोन-तीन दिवस अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, शिफ्टमध्ये काम केले जाणार आहे, असे रॉड्रिग्स यांनी आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले.

स्मार्ट सिटीतील विकास कामांच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या एक-दोन कंत्राटदारांनी कामांमध्ये दिरंगाई केली आहे. त्यांच्यावर योग्य कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या निचऱ्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव झाली आहे. त्यामुळ मोठ्या चार रस्त्यांवर स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडण्याचे काम केले जाणार आहे, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.