महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया 10 मेपासून सुरू

0
19

राज्यातील महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया येत्या 10 मेपासून सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी काल दिली. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवार जाहीर केला. त्यामुळे महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांसाठी एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. महाविद्यालयामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.