मलनिस्सारण खड्ड्यात अडकून कामगाराचा मृत्यू

0
18

जेसीनगर-फोंडा येथे काल संध्याकाळी मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे काम सुरू असताना नझरुल हुसेन शेख (50, रा. चांदनगर-मुंब्रा, मुंबई) या कामगाराचा मृत्यू होण्याची घटना घडली. फोंडा परिसरात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असताना आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. प्राप्त माहितीनुसार काम सुरू असताना मशीनला आपटून खड्डड्यात पडल्याने कामगार गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले; पण इस्पितळात पोहचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. शेख हा गेल्या काही महिन्यापासून कुर्टी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.