पैरा येथे दोन दुचाकींत अपघात; युवक ठार

0
27

पैरा शिरगाव रस्त्यावर काल रविवारी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात पुष्पराज हळदणकर (21) हा पैरा डिचोली येथील युवक ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दुचाकींच्या या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य तिघांना उपचारार्थ इस्पितळात नेण्यात आले. त्यातील एकास गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झालेले आहे. हा अपघात नेमका कसा घडला या बाबत पोलीस चौकशी करीत आहेत अशी माहिती देण्यात
आली.

मृत झालेल्या पुष्पराज याचा मृतदेह शविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून सायंकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी पुष्पराज याच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या युवकाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.