ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी 8 समुद्रकिनाऱ्यांची निवड

0
14

राज्य सरकारने ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी दक्षिण गोव्यातील पाळोळे, आगोंदा, वेळसाव आणि बायणा हे समुद्रकिनारे आणि उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, मोरजी आणि मांद्रे या समुद्रकिनाऱ्यांची निवड केली आहे, अशी माहिती पर्यावरण खात्याचे संचालक जॉन्सन फर्नांडिस यांनी दिली. मानांकनासाठी केवळ 200-300 मीटर भागाचा समावेश केला जाणार असून, मासेमारीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. सरकारने सुरुवातीला मिरामार किनाऱ्याची ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी निवड केली होती. तथापि, त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी 12 ते 14 निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्या निकषांची अंमलबजावणी केल्यास ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळते.