पणजी स्मार्ट सिटीतील हवा प्रदूषणाचा विषय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचला आहे. स्मार्ट सिटीच्या विविध कामांमुळे पणजीतील रहिवाशांना हवा प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पणजी स्मार्ट सिटीतील हवा प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या 26 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. पणजीतील हवा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना आणि महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी हवेची तपासणी करणारी यंत्रणा बसविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.