राज्य सरकार घेणार दीडशे कोटींचे कर्ज

0
13

राज्य सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या अखेरीस सरकारी रोख्यांची विक्री करून अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले जात आहे. यासंबंधीची सूचना राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या कर्ज व्यवस्थापन विभागाने जारी केली आहे.
राज्य सरकारकडून 19 मार्च 2024 रोजी आरबीआयच्या मुंबई शाखेतून सरकारी रोख्यांची विक्री करून 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, यासंबंधीची सूचना 19 मार्चच्या सरकारी पत्रकात जारी करण्यात आली आहे. येत्या 26 मार्च 2024 रोजी सरकारी रोख्यांची विक्री करून 150 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. आरबीआयच्या मुंबई शाखेतून सरकारी रोख्यांची विक्री केली जाणार आहे. यासंबंधीची सूचना 20 मार्च 2024 च्या सरकारी पत्रकात जारी करण्यात आली आहे. राज्यातील विकासकामांसाठी कर्ज घेण्यात येत आहे, असे सूचनेत म्हटले आहे.