अपात्रता याचिका; सुनावणी तहकूब

0
26

गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात दाखल अपात्रता याचिकेवरील सुनावणी काल तहकूब करण्यात आली. आमदार अपात्रता प्रकरणातील प्रतिवादी कामत आणि लोबो यांनी सभापतींसमोर साक्षीदार सादर करण्यासाठी मान्यता मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी काल घेण्यात आली. सभापतींसमोर प्रतिवादींनी दाखल केलेल्या अर्जाला याचिकादार पाटकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सभापतींसमोर केवळ दस्तऐवजाला मान्यता आहे. याचिकेच्या सुनावणीला विलंब करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे, असा दावा पाटकर यांच्या वकिलांनी केली. या अर्जाबाबत सभापतींकडून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.