भाजपला एकूण 6,986.5 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे कॅश, तर 2019-20 मध्ये पक्षाला सर्वाधिक 2,555 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताज्या माहितीचा डेटा अपलोड केला. भाजपनंतर तृणमूल काँग्रेसला 1,397 कोटी, काँग्रेसला 1,334 कोटी आणि बीआरएसला 1,322 कोटी रुपये मिळाले. ओडिशातील बीजेडीला 944.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमकेला 656.5 कोटी, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला 442.8 कोटी रुपये, तर जेडीएसला 89.75 कोटी रुपयांचे रोखे मिळाले. तेलुगू देसम पक्षाला 181.35 कोटी रुपये, शिवसेनेला 60.4 कोटी रुपये, आरजेडी 56 कोटी रुपये, समाजवादी पक्षाला 14.05 कोटी रुपये, अकाली दल 7.26 कोटी रुपये, एआयएडीएमकेने 6.05 कोटी रुपये आणि नॅशनल कॉन्फरन्सने 50 लाख रुपयांचे रोखे कॅश केल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.