कासव संवर्धन केंद्राजवळ अंत्यसंस्काराला सक्त मनाई

0
16

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोरजी येथील कासव संवर्धन केंद्राजवळील पर्यटन विभागाच्या मालकीच्या भूखंडामध्ये अंत्यसंस्कार करण्यास मान्यता देण्यास काल नकार दिला. उच्च न्यायालयाने उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पर्यटन संचालक आणि मोरजी पंचायतीच्या सचिवांना मोरजी येथील कासव संर्वधन केंद्राजवळील पर्यटन विभागाच्या मालकीच्या भूखंडामध्ये अंत्यसंस्कार करण्यास मान्यता देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

गोवा खंडपीठात एका याचिकाकर्त्यांने याचिका दाखल करून मोरजी येथे कासव संवर्धन केद्राच्याजवळील जागेत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. अनेक दशकांपासून त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. सुमारे 67 मीटर अंतरावर कासव अंडी घालत असल्याने त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही, असा दावा याचिकादाराने न्यायालयात केला. तथापि, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. कासव संवेदनक्षम असल्याने संवर्धन क्षेत्राच्या जवळ त्रासदायक गोष्टींना मान्यता दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.