राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदापासून सरकारी पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीची सूचना काल जारी करण्यात आली. यापुढे दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती कार्यक्रम राज्य पातळीवर साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून समाज कल्याण खात्याची नियुक्ती करण्यात आली आहे.