अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

0
11

‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी काल यशस्वी झाली. या क्षेपणास्त्रामध्ये मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञान आहे. अचूक लक्ष्य भेदण्यासाठी याचा वापर होतो. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)ने मिशन दिव्यास्त्र यशस्वीरित्या पार पडले.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डीआरडीओच्या शास्रज्ञांना नव्या यशस्वी चाचणीबद्दल शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे मिशन दिव्यास्त्र या नावाने स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले.

अग्नी 5 हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्राचे वजन 50 हजार किलोग्रॅम आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. त्यावर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रात तीन स्टेज रॉकेट बूस्टर आहेत, जे घन इंधनावर उडतात. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच ते एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते. अग्नि-5 क्षेपणास्त्र ताशी 29,401 किलोमीटर वेगाने शत्रूवर हल्ला करते. हे क्षेपणास्त्र रिंग लेझर जायरोस्कोप इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम, जीपीएस, नेव्हीआयसी सॅटेलाइट मार्गदर्शन प्रणालीने सुसज्ज आहे. अग्नि-5 क्षेपणास्त्र अचूकतेने लक्ष्यावर हल्ला करते.