निवडणूक रोखेप्रकरणी आज होणार सुनावणी

0
21

सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना किती पैसा मिळाला, याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी 30 जूनपर्यंतची वेळ देण्याबाबत एसबीआयने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयात आज सोमवारी सुनावणी होणार आहे.

राजकीय पक्षांना निधी देण्याची निवडणूक रोख्यांची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निकाल गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राजकीय पक्षांना रोख्यांद्वारे किती पैसा मिळाला, याची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यावेळी न्यायालयाने एसबीआयला दिले होते. याप्रकरणी 30 जूनपर्यंतची मुदत दिली जावी, अशी विनंती करणारी याचिका एसबीआयकडून मागील आठवड्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान यावेळी बँकेविरोधात दाखल असलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.