बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी पाकिस्तान घेणार भारताची मदत

0
23

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील केटी बंदर पोर्टजवळ 45 मच्छिमारांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीतील 31 मच्छिमारांची सुटका करण्यात आली, मात्र 14 मच्छीमार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान सरकार भारताची मदत घेणार आहे. पाकिस्तानचे खासदार आगा रफिउल्ला यांनी मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी भारताकडून मदत घेण्याबाबत त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांच्याशी चर्चा केली आहे. पाकिस्तानी नौदल आणि तटरक्षक दल मच्छिमारांच्या शोधात व्यस्त आहेत. 45 मच्छिमारांनी भरलेली बोट 5 मार्चला बुडाली. शोध-बचाव मोहिमेदरम्यान पाकिस्तानने 31 मच्छिमारांना वाचवले होते. मात्र अपघात होऊन 5 दिवस उलटले तरी 14 मच्छीमार बेपत्ता आहेत. हे सर्व कराची येथील रहिवासी आहेत.