राज्य सरकारने राज्यातील सर्व बारा तालुक्यांतील सुमारे 312 सरकारी इमारतींवर रूफटॉप सोलर पॉवर प्लांट उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्यात हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यांत राज्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये 312 सरकारी इमारतींवर रूफटॉप सोलर पीव्ही प्लांट बसवण्यात येणार आहेत.
या उपक्रमातून 20-28 मेगावॅट हरीत वीज तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने 30 मेगावॅट रूफटॉप सोलर पीव्ही प्लांटच्या 25 वर्षांसाठी डिझाईन, अभियांत्रिकी खरेदी आणि पुरवठा, उभारणी, चाचणी, कार्यान्वित आणि सर्वसमावेशक ऑपरेशन आणि देखभाल यासाठी ई-निविदेद्वारे संभाव्य बोलीदारांकडून ऑनलाइन निविदा मागवल्या आहेत.