चंदीगड महापालिकेत भाजपचा उपमहापौर

0
27

चंडीगड महापालिकेच्या वरिष्ठ उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कुलजीत संधू यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा काल पराभव केला. भाजप उमेदवाराला 19 मते मिळाली, तर आप आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार गुरप्रीत बक्षी यांना 17 मते मिळाली, तर 1 मत अवैध ठरले. त्यामुळे वरिष्ठ उपमहापौरांची खुर्ची पटकावली आहे.