1 लाख चौ.मी. जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर

0
17

राज्य सरकारच्या नगरनियोजन खात्याने प्रादेशिक आराखडा 2021 मधील भातशेती, खेळाचे मैदान, फळबाग, नैसर्गिक आच्छादन, लागवडी योग्य असलेली राज्यभरातील 29 भूखंडांमधील सुमारे 1 लाख 16 हजार 066 चौरस मीटर जमीन टीसीपी कायद्याच्या 17 (2) अंतर्गत सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरित केली आहे. नगरनियोजन खात्याने यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. नगरनियोजन खात्याने प्रादेशिक आराखडा 2021 मधील राखीव जमिनीचे सेटलमेंट विभागात रुपांतराचा सपाटा लावलेला आहे.