बारावीची परीक्षा आजपासून सुरू

0
7

गोवा उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्तेची परीक्षा आज (दि. 28) पासून सुरू होत आहेत. यंदा राज्यभरातील 17,989 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा राज्यातील 20 केंद्रांतून घेण्यात येणार असून, ती 18 मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षार्थींपैकी 8550 मुलगे, तर 9437 मुली आहेत. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील असून, त्यांची संख्या 5883 एवढी आहे. त्यापाठोपाठ 5320 विद्यार्थी हे वाणिज्य शाखेतील आहेत. कला शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 4309 एवढी आहे. 2475 विद्यार्थी हे व्यावसायिक शाखेतून परीक्षा देणार आहेत.