- डॉ. मनाली महेश पवार
वयात येताना मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, नाहीतर चुकीचे समज तसेच कायम राहतात. आजची वंधत्वाची वाढती समस्या लक्षात घेता प्रजनन संस्था निरोगी ठेवणे किती गरजेचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो, ज्याद्वारे लहान मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होते. हीच स्त्री पुढे मातृत्वासाठी सक्षम होते. परंतु पाळी आल्यावर आपण सर्रास काय शिकवतो? तर हे अशुद्ध रक्त आहे, शरीरातील घाण आहे- जी दर महिन्याला तुझ्या शरीरातून अशीच बाहेर पडणार. खरेच आपण आपल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करतो का हो? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर महिन्याला योनीद्वारे बाहेर पडणारे रक्त हे अशुद्ध नसते हे तुम्ही समजून घ्या. काहीतरी मुलींना सांगायचे, वेळ मारून न्यायची म्हणून ही उत्तरे देऊ नका. त्यांच्या शंकांचे योग्यरीत्या निरसन करा.
- मासिक पाळी येण्याची प्रक्रिया काय असते? मासिक पाळीचक्र किती दिवसांचे असते?
- मासिक पाळीतील टप्पे.
- मासिक पाळी येण्याचे वय, मासिक पाळीपूर्वी आणि दरम्यान दिसून येणारी लक्षणे.
- मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी, स्वच्छता.
- मासिक पाळी दरम्यान वापरात येणारे प्रोडक्ट्स.
- मासिक पाळी दरम्यानचा आहार-विहार.
- आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षण (सेक्युअल एज्युकेशन).
लैंगिक शिक्षणासंदर्भात मुलींशी बोला. आईला बोलायला, सांगायला, चर्चा करायला जमत नसल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घ्या व वेळेवर समुपदेशन करा.
मासिक पाळीविषयी शास्त्रोक्त माहिती
- स्त्रिया जन्माला येतात तेव्हाच त्यांच्या अंडाशयात लाखो स्त्रीबीजे उपस्थित असतात.
- गर्भाशय खालून योनीमार्गाला उघडतो. गर्भाशयाला वर दोन फेलोपियन ट्यूब आणि त्यालगत दोन्ही बाजूला दोन ओव्हरीज असतात. ओव्हरीज एग्ज रिलिज करू लागतात तेव्हा मासिक पाळी सुरू होते.
- वयाच्या 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान मासिक पाळीचक्र सुरू होते. हल्ली हा काळ जरा लवकर सुरू होत आहे, म्हणजे साधारण 9 ते 15 वर्षांच्या दरम्यान पाळी सुरू होत आहे.
- साधारणपणे पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी पाळी येते. पण हे स्त्रीपरत्वे बदलू शकते. म्हणजे 28 ते 45 दिवस असाही कालावधी असतो.
- मासिक पाळीत रक्तस्राव होण्याचा कालावधी 4 दिवस असतो किंवा 8 दिवसांपर्यंत असू शकतो.
- 45 ते 55 वयात मासिक पाळी बंद होते. स्त्रीबीजांचा साठा वयानुसार कमी कमी होतो आणि मासिक पाळीचक्र थांबते.
- मासिक पाळी दरम्यान दिवसातून 3 हून अधिक पॅड बदलावे लागत असल्यास त्याला हेवी पिरिएड्स म्हणतात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीतील रक्तस्राव शुद्ध असतो.
मासिक पाळी प्रक्रिया
ओव्हरीज दर महिन्याला मॅच्युअर एग्ज रिलिज करण्याचे काम करतात. फेलोपियन नलिकांच्या पुढे असलेल्या कोषिका हे एग्ज कलेक्ट करतात तेव्हा एग्ज फेलोपियन ट्यूबमध्ये प्रवेश करतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शरीर इस्ट्रोजन, प्रोजेक्टेरॉन, प्रोलॅक्टिन असे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स तयार करते. यावेळी प्रेग्नन्सीसाठी गरजेचे असे गर्भाशयातील अस्तर बनते. ओव्युलेशन काळात संबंध न घडल्यास मासिक पाळी येते. पाळीतील स्रावासोबत गर्भाशयातील अस्तरदेखील तुकड्यांच्या स्वरूपात बाहेर पडते. यालाच ‘मासिक पाळी’ म्हणतात.
मासिक पाळीतील टप्पे
पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर दुसरी पाळी येईपर्यंतचा काळ म्हणजे मासिक पाळीचक्र.
- चशर्पीीीींरश्र झहरीश – मासिक पाळी सुरू होतो तो कालावधी.
- ऋेश्रश्रळर्लीश्ररी झहरीश – मासिक पाळीपासून ते ओव्युलेशनपर्यंत म्हणजे 10-14 दिवसांपर्यंतचा काळ.
- र्जीीश्ररींळेप झहरीश – या काळात ओव्हरिज मॅच्युअर एग्ज रिलिज करतात. 28 दिवसांची मासिक पाळी असल्यास हा स्राव 12, 13 व 14 व्या दिवशी असू शकतो.
- र्ङीींशरश्र झहरीश – ओव्युलेशन झाल्यापासून ते मासिक पाळी येईपर्यंतचा काळ.
प्रत्येक मुलीचे वयात येण्याचे वय जरी वेगवेगळे असले तरी पाळी सुरू होण्यापूर्वी साधारण दीड ते दोन वर्षे काही शारीरिक व मानसिक बदल मुलींमध्ये घडत असतात. आईने त्यावर लक्ष द्यावे व पुढे सुरू होणाऱ्या मासिक पाळीबद्दल ज्ञान द्यावे. - स्तन विकसित व्हायला लागतात. नितंब विस्तृत व्हायला लागतात.
- काखेत- जांघेत केस यायला लागतात.
- योनीमार्गातून पांढरा चिकट द्रवस्राव होतो.
- भरपूर घाम येतो व घामाला वास येतो.
- चेहऱ्यावर मुरमं येतात.
वरील लक्षणे आपल्या मुलींमध्ये दिसत असल्यास पुढील दोन वर्षाच्या काळात मुलीचा मासिक धर्म सुरू होणार हे जाणावे व मुलीला खालील पाच महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान- माहिती देणे हे प्रत्येक मातेचे कर्तव्य आहे.
- पाळीदरम्यान वापरण्याचे साधन.
- पाळीदरम्यान जाणवणारी सामान्य लक्षणे.
- पाळीदरम्यानची स्वच्छता.
- पाळीदरम्यान वापरलेल्या साधनांची विल्हेवाट.
- पाळीदरम्यानचा सकस आहार-विहार.
1) पाळीदरम्यान वापरण्याची साधने
- कपडा, सॅनिटरी पॅड, टॅम्पोन, मेन्स्टुअल कप व पिरियड पँटीज. पूर्वी पाळीदरम्यान रक्तस्राव शोषून घेण्यासाठी कपड्याचा वापर अधिक करत असत. आता याचे प्रमाण कमी झाले आहे. वापरत असल्यास हेदेखील एक उत्तम साधन आहे. फक्त कपडा वापरत असल्यास तो स्वच्छ असावा. प्रत्येक वेळी चांगला कडकडीत गरम पाण्यात साबणाने स्वच्छ धुवून कडक उन्हात सुकवून वापरावा. हे कपडे दर तीन महिन्यांनी बदलावेत.
सॅनिटरी पॅड ः ही तीन स्तरांची असते. सर्वात खालचा स्तर प्लास्टिकचा असतो, जेणेकरून हा अंतर्वस्त्राला चिकटवला जातो व त्यातून रक्त बाहेर लागत नाही. शाळकरी मुलींसाठी ही सॅनिटरी नॅपकिन सरकारकडून फ्री मिळतात. त्याचप्रमाणे त्याचा उपयोग करणे सोयिस्कर होते. हे पॅड दर पाच-सहा तासांनी बदलावे.
टॅम्पोन ः हे साधन कमी रक्तस्राव होत असल्यास उपयोगी पडते. हे ॲप्लिकेटरसोबत किंवा नुसतेच येतात. हे टॅम्पोन योनी भागात बोटांनी किंवा ॲप्लिकेटरने ढकलावे. साधारण दोन ते तीन तासांनी बदलावे.
मेन्स्टुअल कप ः हे सिलिकॉनपासून बनलेले असते. हे कप दुमडून योनीभागात घालावे. यात भरलेले रक्त तीन-चार तासांनी ओतावे व धुवून परत वापरता येते.
पिरिडय पँटीज ः सध्या शाळकरी मुलींसाठी किंवा प्रथमच पाळी येणाऱ्या मुलीसाठी हे योग्य साधन आहे. हे अंतर्वस्त्राप्रमाणे घालावे.
2) पाळीदरम्यान जाणवणारी सामान्य लक्षणे
- पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, चक्कर, थकवा, ॲलर्जी, स्तनभागी तडत्व व वेदना, चिडचिड, मूड स्वींग इत्यादी. वरील लक्षणे जास्त त्रासदायक असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नाहीतर गरम पाण्याने शेकणे, तेलाने हळुवार समाज करणे, गरम पाणी चहाप्रमाणे थोडे-थोडे पिणे, ओवा खाणे, जिऱ्याचे पाणी घेणे, हळदीचे गरम दूध पिणे, रिंगावाण्टक चूर्णासारखे चूर्ण सेवन करणे इत्यादी साध्या घरगुती उपायांनी आराम मिळतो.
3) पाळीदरम्यानची स्वच्छता
- ही स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. रोज आंघोळ करावी. पॅड किंवा इतर साधने वापरताना व काढताना हात स्वच्छ धुवावेत. कमरेखालील भाग म्हणजे गुप्तांग व आजूबाजूचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ करावा. अंतर्वस्त्रे गरम पाण्याचे धुवावीत.
4) पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधनांची विल्हेवाट
- सॅनिटरी पॅड, टॅम्पोन्स पेपरमध्ये गुंडाळून डस्टबिनमध्ये टाकावीत. संडासात फेकू नयेत किंवा जागा असल्यास जमिनीत खड्डा काढून टाकावीत. मेन्स्टुअल कप्स गरम पाण्यात उकळून निर्जंतुक करावीत.
5) पाळीदरम्यानचा सकस आहार-विहार - पाळीदरम्यान सकस चौरस आहार सेवन करावा. लोहयुक्त असा आहार असावा. अजीर्ण असल्यास हलका आहार सेवन करावा. फळे, भाज्या, अंडी, मासे, फळभाज्या, तूप-भात, वरण-भात, दही, ताक असा आहार सेवन करावा. जेवण ताजे व गरम असताना सेवन करावे. फळांचा रस, दूध, लाजामण्ड थकवा दूर करण्यास मदत करते. या काळात गरम पाणी वारंवार पिल्यास औषधासारखे काम करते. त्याचप्रमाणे पुरेशी झोप व विश्रांती घेतल्यास पाळी त्रासदायक वाटत नाही. त्याचप्रमाणे साधी-सोपी आसने किंवा हलका व्यायाम करावा.
वयात येताना मुलींना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते, नाहीतर चुकीचे समज तसेच कायम राहतात. आजची वंधत्वाची वाढती समस्या लक्षात घेता प्रजनन संस्था निरोगी ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात आलेच असेल.