>> ओखा ते द्वारका सुदर्शन सेतूचे उद्घाटन
माझ्या डोळ्यांसमोर भारताच्या वैभवाचे चित्र फिरत आहे. आज मी द्वारकेच्या समुद्रात बराच वेळ राहिलो. मी तिथे पाण्याखाली गेलेली द्वारका पाहिलीच नाही, तर विकसित भारतासाठी माझा संकल्प बळकट करून तिथून परत आलो. 2017 मध्ये मला त्याची पायाभरणी करण्याची संधी मिळाली आणि आज त्याचे उद्घाटन करण्याचीही शुभ संधी मला मिळाली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. गुजरातमध्ये ओखा ते बेट द्वारका जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. काल रविवारी पंतप्रधान मोदी यांनी प्रथम बेट द्वारका येथे भगवान द्वारकाधीशची पूजा केली. यानंतर त्यांनी या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. या सेतूमुळे आता ओखा (द्वारका) ते बेट द्वारकेला जाण्यासाठी लोकांना बोटींवर अवलंबून राहावे लागणार नाही. हा पूल बांधण्यासाठी 978 कोटी रुपये खर्च आला आहे.
पुलाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. त्यांनी येथील लोकांचीही भेट घेतली. मोदींनी सौराष्ट्रात 52 हजार 250 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. मोदी शनिवारी (24 फेब्रुवारी) सायंकाळी उशिरा जामनगरला पोहोचले. त्यांनी येथे रोड शोही केला.
आधी पूजा मग उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वप्रथम बेट द्वारकाच्या द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मोदींनी सुदर्शन पुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर 3 जिल्ह्यांतील 4 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. द्वारका, जामनगर आणि पोरबंदर जिल्ह्यात 11 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विकासकामांमध्ये रस्ते, इमारत बांधकाम, नागरी विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पेट्रोलियम आणि वायू, यांचा समावेश आहे.
मोदींनी केले खोल समुद्रात स्कुबा डायव्हिंग
पंतप्रधान मोदी गुजरातमधील प्राचीन द्वारकेचे दर्शन घेण्यासाठी खोल समुद्रात गेले. मोदींनी खोल समुद्रात पाण्याखाली जात द्वारकेजवळ जात प्रार्थना केली. द्वारका येथे मोदींनी द्वारका या पीठाच्या शंकराचार्यांचेही दर्शन घेतले आणि त्यांना पुष्पहार अर्पण केला. शंकराचार्य़ांनी मोदींना वस्त्र आणि रुद्राक्षांची माळ भेट दिली आहे. यानंतर मोदी बोटीतून समुद्रात गेले. पुढे त्यांनी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारकेचे दर्शन घेतले. मोदींनी द्वारकेचे दर्शन घेतल्यानंतर आपले अनुभवही शेअर केले. आजच्या अनुभवाने भारताच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक बाबींच्या मुळाशी जाता आले, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी मोदींनी श्रीकृष्ण आपणा सर्वांना आशीर्वाद देईल, असेही पीएम मोदींनी म्हटले आहे. मोदी द्वारकेच्या समुद्रात स्कुबा डायव्हिंग करायला गेले. येथे समुद्राच्या आत त्यांनी मोराची पिसेही अर्पण केली. मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारेकेचे दर्शन घेतले असे मोदी म्हणाले.
सुदर्शन सेतूचे उद्घाटन
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी बेट द्वारकास्थित मंदिरात गेले होते. सकाळी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वांत मोठा केबल ब्रीज आहे. 2017 मध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते.