समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. मात्र या चर्चेतून ठोस असा तोडगा निघत नव्हता. मात्र जागावाटपाच्या चर्चेवर या दोन्ही पक्षांत सहमती झाली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेत सहभाग नोंदवला. ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आहे.
काही दिवसांपूर्वी जागावाटपावरील चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यामुळे समाजवादी आणि काँग्रेस यांच्यातील वाद टोकाला गेला होता.