पणजी पीडीएसाठी हरकती मागवल्या

0
6

पणजी नियोजन विभागासाठी (पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीच्या काही भागासह) उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने लोकांकडून दोन महिन्यांच्या आत हरकती मागवल्या आहेत. जमीन वापर नकाशा व जमीन वापर रजिस्टर यासंबंधीच्या हरकती असल्यास त्या दोन महिन्यांच्या आत सादर कराव्यात, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. बाह्यविकास आराखडा 2031 च्या मसुद्याच्या प्रती लोकांना पाहता याव्यात यासाठी त्या एनजीपीडीएच्या कार्याल्यात उपलब्ध असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय ह्या प्रती पेन्ह-द-फ्रान्स पंचायत, बिठ्ठोण पंचायत तसेच अन्य संबंधित कार्यालयात लोकांसाठी उपलब्ध असल्याचेही प्राधिकरणाने म्हटले आहे. प्राधिकरण लोकांच्या हरकती ऐकून घेईल. तसेच नगरनियोजन कायद्याच्या कलम 35 (5) नुसार ज्यांना वैयक्तिक सुनावणी हवी असेल, ती एनजीपीडीएच्या कार्यालयात घेण्याची सोय करेल. लोकांना आपल्या हरकती उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव, पहिला मजला, शांता बिल्डिंग, विवांता हॉटेलजवळ, सांतइनेज पणजी, गोवा येथे सादर कराव्या लागतील.