अनुसूचित जमातीच्या आरक्षणप्रकरणी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण प्रकरणी लवकरात लवकर पावले उचलावीत अशी विनंती केली. अनुसूचित जमातीचे शिष्टमंडळ गृहमंत्री शहा यांना मागाहून भेटणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्री शहा यांनी या प्रश्नाचे निराकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे दिले आहे.