पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केल्यानंतर पेटीएमबाबत अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण देताना कंपनीचा क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही समस्येशिवाय काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने व्यापाऱ्यांना त्यांचे नोडल खाते क्सिस बँकेला दिले आहे. यासाठी एस्क्रो खाते उघडले जाईल. आरबीआय बँकेने पेटीएमला दिलासा देत ठेवी घेण्यावरील बंदीची अंतिम तारीख 29 फेब्रुवारीवरून वाढवून 15 मार्च केली आहे. त्यामुळे पेटीएमची व्यापारी पेमेंट सेवा 15 मार्चनंतरही सुरू राहणार आहे.