राज्यातील कमाल तापमानात वाढ

0
27

राज्यातील कमाल तापमानात काल वाढ नोंद झाली. कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले असून, ते सामान्य तापमानापेक्षा 3.6 अंशांनी जास्त आहे. किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. पुढील दोन दिवस कमाल तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअस एवढे जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात दोन दिवस कमाल तापमान 34-36 डिग्री सेल्सिअसच्या श्रेणीत आणि सामान्यापेक्षा 2 ते 4 डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात फेब्रुवारी 2009 मध्ये 39.2 अंश सेल्सिअस एवढ्या जास्त कमाल तापमानाची नोंद झाली होती, तर 16 फेब्रुवारी 2023 रोजी 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.