उत्तर गोव्याची भाजपची उमेदवारी श्रीपाद नाईकांनाच

0
9

>> म्हापशात मुख्यमंत्र्यांकडून संकेत

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी केंद्रीय मंत्री, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना मिळण्याचा संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या उत्तर गोवा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना म्हापसा येथे काल दिले.

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा मतदारसंघात लोकांना जो उमेदवार हवा आहे, त्यालाच उमेदवारी दिली जाईल. तो उमेदवार कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. काही निर्बंधांमुळे सध्या त्याचे नाव घेऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक प्रबळ दावेदार आहेत.