थिवी खाणपट्ट्यासाठी 15 मार्चला सुनावणी

0
6

अडवलपाल-थिवी येथील खाणपट्ट्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 15 मार्च रोजी पर्यावरणासंबंधीची जाहीर सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी डिचोली येथे होणार आहे. यावेळी स्थानिकांना या खाणीसंबंधीचे त्यांच्यासाठी चिंतेचे असलेले प्रश्न खाणचालकाला विचारता येतील. ही सुनावणी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन 2006 नुसार घेतली जाणार आहे. ही सार्वजनिक सुनावणी 15 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. डिचोली येथील जिमखाना, हिराबाई झांट्ये मेमोरियल हॉल, शांतादुर्गा हायस्कूलजवळ ही सुनावणी होणार आहे. ज्यांना ह्या सुनावणीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नावनोंदणी करावी लागेल.