गोवा विधानसभा अधिवेशन चालू असताना सभापती रमेश तवडकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या प्रकरणी माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्याविरुध्द काल गोवा विधानसभेत हक्कभंगाचा ठराव मांडण्यात आला.सभापती रमेश तवडकर यांनी स्वत:च हा ठराव मांडताना प्रकाश वेळीप यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून सभापतीपदाचा अपमान केला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यासाठी माफी मागण्यासाठी त्यांना सभागृहात बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकरच्या भ्रष्टाचारासंबंधीचे वृत्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यायला हवी, असे स्पष्ट करून त्यांना माध्यमांनाही यावेळी इशारा दिला. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.